जंबो क्रिकेट क्लब,एचएएल विजयी

हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी- कुणाल जाधव,

नाशिक- नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित, मेसन ट्रेडर्स व मेसन डेव्हलपर्स पुरस्कृत हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीच्या खुल्या गटात हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर बाराव्या दिवशी जंबो क्रिकेट क्लब व एच ए एल यांनी आपले सामने जिंकले.

पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना जंबो क्रिकेट क्लबने नाशिक जिमखाना बी विरुद्ध १३३ धावा केल्या. हिमांशु बडगुजरने ३१ व तेजस पिंपळेने २९ धावा केल्या. नाशिक जिमखाना बीच्या हुजैफ शेखने ४ बळी घेतले. उत्तरादाखल नाशिक जिमखाना बीला केवळ ६६ धावाच करता आल्याने जंबो क्रिकेट क्लब ६७ धावांनी विजयी झाले. जंबोच्या कुणाल जाधवने ४ तर समद अत्तारने ३ गडी बाद केले.

दुसऱ्या सामन्यात २२ यार्डस एने एच ए एल विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना ३१९ धावा केल्या . तनवीर सिंगने सर्वाधिक ७७ तर स्वप्नील राठोड ६० , ओमकार भवर ५५ व शौनक साठेने ४६ धावा केल्या . एच ए एलच्या जितेंद्र वाळूंजने ४ व दिपक शिंपीने ३ बळी घेतले. विजयासाठीच्या ३२० धावा एच ए एलने योगेश राजदेव ७८, अकील शेख ७२ , दिपक शिंपी नाबाद ५३ व प्रवीण डीमले नाबाद ४६ यांच्या फलंदाजीच्या जोरावर पार करत ५ गडी राखून विजय मिळवला.

Leave a Reply

Your email address will not be published.

X