`एम सी व्ही एस` विरुद्ध नाशिकचे आघाडीचे गुण

राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा: शार्विन किसवे,पुष्कर अहिरराव,दिर्घ ब्रम्हेचाची उत्कृष्ठ खेळी

नाशिक- वडकी(पुणे) येथील विराग क्रिकेटच्या मैदानावर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, राज्यस्तरीय १९ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या अव्वल साखळी क्रिकेट ( इन्व्हिटेशन सुपर लीग ) स्पर्धेत, पावसाने प्रभावित दोन दिवसीय कसोटी सामन्यात नाशिकने एम सी व्ही एस विरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे गुण घेतले.

ओल्या मैदानामुळे पहिल्या दिवशी सुरुवातीला सामन्याचे चार तास खेळ होऊ शकला नाही. प्रथम फलंदाजी मिळालेल्या एम सी व्ही एस ने पहिल्या डावात ५६ षटकांत १३७ धावा केल्या. सागर पवारने सर्वाधिक ३९ धावा केल्या. नाशिकतर्फे लेग स्पिनर हुजैफ शेखने ४, समकीत सुराणा व रोहन शेडगेने प्रत्येकी २ तर गुरमान सिंग रेणु व वेद सोनवणेने प्रत्येकी १ गडी बाद केला. उत्तरादाखल कर्णधार शर्विन किसवे ७५ , पुष्कर अहिरराव ४६ , दीर्घ ब्रम्हेचा ३६ धावा , यांच्या फलंदाजीच्या जोरावर नाशिकने ५० षटकांत ९ बाद २६१ धावा फटकवत डाव घोषित केला. एम सी व्ही एस च्या विशाल शर्माने ५ बळी घेतले.दुसऱ्या डावात एम सी व्ही एस ने सामना संपेपर्यंत १९ षटकांत २ बाद ४५ धावा करत नाशिकला निर्णायक विजय मिळवून दिला नाही. हुजैफ शेखने दोन्ही गडी बाद केले.

पुढील सामना : १५ मे : वि. डी व्ही सी एस .

Leave a Reply

Your email address will not be published.

X