मेरी क्रिकेट क्लब,द्वारकाचा सहज विजय

हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी: उत्कृष्ठ फलंदाजीच्या जोडीला गोलंदाजीत रोमहर्षकता

नाशिक- जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित, मेसन ट्रेडर्स व मेसन डेव्हलपर्स पुरस्कृत हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीच्या खुल्या गटात हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर बाराव्या दिवशी मेरी क्रिकेट क्लब व द्वारका क्रिकेट अकादमी यांनी आपले सामने जिंकले.

पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पंचवटी क्रिकेट क्लबने मेरी क्रिकेट क्लब विरुद्ध १९७ धावा केल्या. हार्दिक गज्जरने ४४ व सुजीत यादवने २८ धावा केल्या. मेरीच्या संदिप पाटीलने ४ बळी घेतले. उत्तरादाखल प्रवीण पाडवीच्या नाबाद ७२ व पुष्कर अहिररावच्या ४३ धावांच्या जोरावर मेरीने ४ गडी राखून विजय मिळवला. पंचवटीच्या सुजीत यादवने ३ बळी घेतले.

रोहित पुरोहित,कांचवाल,नाथवानीची उत्कृष्ठ गोलंदाजी

दुसऱ्या सामन्यात द्वारका क्रिकेट अकादमीने नाशिक जिमखाना ए विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना १६९ धावा केल्या . रोहित पुरोहितने सर्वाधिक ३५ तर मुस्तानसिर कांचवाला ३३ ,आनंद विश्वकर्मा नाबाद ३२ व हर्ष शार्दूलने २५ धावा केल्या . उत्तरादाखल नाशिक जिमखाना ए संघ १४५ पर्यंतच मजल मार शकला. द्वारकाच्या रोहित पुरोहित ने ४ तर मुस्तानसिर कांचवाला व स्मित नाथवानी यांनी प्रत्येकी ३ बळी घेऊन संघाला २४ धावांनी विजयी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

X