एन एस एन सी सी, केन्सिंग्टन, एन एस एफ ए, मेरीची विजयी सलामी

एन डी सी ए च्या १२ वर्षांखालील व्ही जी एस समर लीगचा शुभारंभ, सैय्यद, तिडके यांची शतकी खेळी,गोलंदाजीत सोनवणे,वैशपांयन चमकले

नाशिक- जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित, खास १२ वर्षांखालील वयोगटासाठीची व्ही जी एस समर लीगच्या सामन्यांना महात्मानगर क्रिकेट मैदानावर शुभारंभ झाला. आजच्या सामन्यांमध्ये एस एन सी सी, केन्सिंग्टन, एन एस एफ ए, मेरी यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर सहज विजय नोंदवत विजयी सलामी दिली.

व्ही जी एस ग्रुप चे रोहित वैशंमपायन यांच्या सहकार्याने हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी स्पर्धेची सुरवात सहायक जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे व सहायक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या हस्ते नाणेफेकीने करण्यात आली. यावेळी रोहित वैशंपायन , सौ वैशंपायन, असोसिएशनचे चेअरमन विनोद शहा, सेक्रेटरी समीर रकटे, हेमंत देशपांडे , शिवाजी उगले ,शेखर घोष व रतन कुइटे आदी उपस्थित होते.

सैय्यद,तिडकेची नाबाद शतकी खेळी

महात्मानगर १ वरील पहिल्या सामन्यात एन एस एन सी सी चे फलंदाज हमजा सैय्यद ११५ व मयांक तिडके नाबाद १०३ या शतकवीरांच्या जोरावर २७१ धावा करून द्वारका क्रिकेट अकादमीवर २४२ धावांनी मोठा विजय मिळवला. आयुष सानपने ३ तर प्रज्वल सांगळे व आयुष डिंगरने प्रत्येकी २ बळी घेत द्वारकाला २९ धावांत गारद केले.

कैन्सिंटनची सांघिक खेळी

महात्मानगर २ वरील पहिल्या सामन्यात केन्सिंग्टनने एन डी सी ए वर ८१ धावांनी मात केली. केन्सिंग्टनच्या अबीर आफळे ३७ व निवान धाम ३३ मुळे ६ बाद १४५ धावा झाल्या. नंतर आर्यवर्त सोनवणेने ३ व मिहिर वैशंमपायनने २ गडी बाद करत एन डी सी एला ६४ धावांत रोखत विजय मिळवला.

एनएसएफची सात गडी राखून विजय

महात्मानगर १ वरील दुसऱ्या आर व्ही स्पोर्ट्स वि एन एस एफ ए सामन्यात आर व्ही स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करत ९४ धावा केल्या. कर्णधार आर्यवीरने सर्वाधिक ३७ धावा केल्या . साई थोरातने ३ व सर्वेश पाटीलने २ बळी घेतले. विजयासाठीच्या ९५ धावा निर्वाण सिंग च्या ३२ धावांच्या जोरावर पार करत एन एस एफ एने ७ गडी राखून आरामात विजय मिळवला.

मेरीचा आरामात विजय

महात्मानगर २ वरील दुसऱ्या निवेक वि मेरी सामन्यात निवेकला मेरीने ७२ धावांत रोखले . सोहम मोराडेने ३ व शुभम सिंगने २ बळी घेतले. नंतर रुद्र मेणेच्या नाबाद २४ धावांच्या जोरावर मेरीने ९ गडी राखून आरामात विजय मिळवला.

Leave a Reply

Your email address will not be published.

X