नाशिक- हिंगोली सामना अनिर्णित

राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा- श्री साई युवाचा निर्णायक विजय , यूनायटेडला आघाडीचे गुण

नाशिक- येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, राज्यस्तरीय १९ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( एम सी ए इन्विटेशन लीग ), पावसाने प्रभावित, नाशिक विरुद्ध हिंगोली दोन दिवसीय कसोटी सामना अनिर्णित राहिला.

महात्मा नगर क्रिकेट मैदानावर पहिल्या दिवशी पाच तासांपेक्षा जास्ती वेळ ओल्या मैदानामुळे होऊ शकला नाही . हिंगोलीने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजी करताना ९० षटकांत ३३७ धावा केल्या. प्रथम पाखेने सर्वाधिक ८८, सर्वज्ञ वेलापुरेने ६५ , योगेश चव्हाणने नाबाद ५१ व निशांत जोशीने ४२ धावा केल्या. नाशिकतर्फे समकीत सुराणाने ४, रोहन शेडगेने २ तर शिवंश सिंग, हुजैफ शेख व केयूर कुलकर्णीने प्रत्येकी १ बळी घेतला. राहिलेल्या वेळात उत्तरादाखल नाशिकने ३८ षटकांत ७ बाद १८४ धावा केल्या . सलामीच्या पुष्कर अहिररावने ३७ व प्रणव येवले ने ३६ धावा केल्या.

साई युवाची सहा गडी राखून मात

इतर दोन सामन्यांत संदीप फौंडेशनच्या मैदानावर श्री साई युवा क्रिकेट अकादमीने सातारा वर ६ गडी राखून विजय मिळविला.

( संक्षिप्त धावफलक : सातारा पहिला डाव ६४ व दुसरा डाव १९५ श्री साई युवाच्या सॅविओ डी चे ७ व ४ बळी वि श्री साई युवा क्रिकेट अकादमी पहिला डाव १५० व दुसरा डाव ४ बाद ११३ ).

आणि एस एस के मैदानावर यूनायटेडने पारसी जिमखाना विरुद्ध वर पहिल्या डावातील आघाडीचे गुण घेतले .

( संक्षिप्त धावफलक : यूनायटेड पहिला डाव ८ बाद २३१ – नील गांधी नाबाद १०१ वि पारसी जिमखाना पहिला डाव १२७ व फॉलोऑन नंतर दुसरा डाव १२१

Leave a Reply

Your email address will not be published.

X