`नाशिक`ला `स्पोर्टसमन` वर पहिल्या डावातील आघाडीचे गुण

राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा : सी एन ए चा निर्णायक विजय, हिंगोलीला आघाडी चे गुण, ध्रुव एखंडे ११८, ऋग्वेद जाधव ९२, व्यंकटेश बेहरे ५ बळी

नाशिक- येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, राज्यस्तरीय १६ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( एम सी ए इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात नाशिकने स्पोर्टसमनवर पहिल्या डावातील आघाडीचे गुण घेतले .

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर हा सामना सुरु आहे. प्रथम फलंदाजी करत स्पोर्टसमनने २१० धावा केल्या. कर्णधार रुद्र किर्दतने ८८ धावा केल्या. व्यंकटेश बेहरेने ५, अर्णव तांबटने ३ तर कौस्तुभ रेवगडे व अथर्व सूर्यवंशीने प्रत्येकी १ गडी बाद केला. उत्तरादाखल नाशिकने ध्रुव एखंडेच्या ११८ व ऋग्वेद जाधवच्या ९२ धावांच्या जोरावर ९ बाद ३४५ धावा केल्या व पहिल्या डावात स्पोर्टसमनवर १३५ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात स्पोर्टसमनने ६ बाद १४० धावा केल्या. या अनिर्णित सामन्यात नाशिकने स्पोर्टसमनवर पहिल्या डावातील आघाडीचे गुण घेतले .

सीएएनचा जालन्यावर दहा गडी राखून मोठा विजय

इतर दोन सामन्यांत महात्मा नगर क्रिकेट मैदानावर सी एन एने कपिल कांबळेच्या सामन्यातील १० व कर्णधार आदित्य भटच्या ९ बळींच्या जोरावर जालना विरुद्ध १० गडी राखून मोठा विजय मिळवला.

( संक्षिप्त धावफलक : सी एन ए पहिला डाव १८७ व दुसरा डाव बिनबाद ९ वि जालना पहिला डाव ५९ व फॉलोऑन नंतर दुसरा डाव १३६ ).

तर एम सी सी मैदानावर हिंगोलीने ज्युडिशियल विरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे गुण घेतले . हिंगोलीचा निर्णायक विजय ज्युडिशियलने थोडक्यात हुकवला.

( संक्षिप्त धावफलक : हिंगोली पहिला डाव २३० व दुसरा डाव ६ बाद १६५ ज्युडिशियल पहिला डाव १०३ व दुसरा डाव ९ बाद १०९ ).

Leave a Reply

Your email address will not be published.

X