नाशिकचा हिंगोलीवर मोठा विजय

राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा ( १६ वर्षांखालील ): जालनाचाहि निर्णायक विजय , स्पोर्टसमनला आघाडीचे गुण

नाशिक- येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, राज्यस्तरीय १६ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( एम सी ए इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात नाशिकने हिंगोली वर एक डाव व १६१ धावांनी मोठा विजय मिळवला. अर्णव तांबटने अष्टपैलू तर व्यंकटेश बेहरेने गोलंदाजीत चमक दाखवली.

एस एस के मैदानावर प्रथम फलंदाजी मिळालेल्या नाशिकने ७१.२ षटकांत ९ बाद ३२६ धावा केल्या. सलामीवीर अर्णव तांबटने ९१ व ध्रुव एखंडेने ५९ धावा केल्या. ज्ञानदीप गवळीने ५० व अथर्व सूर्यवंशीने ४६ धावा केल्या. ओमकार वाघने ५ बळी घेतले. उत्तरादाखल व्यंकटेश बेहरेच्या ६ बळी घेणाऱ्या जोरदार गोलंदाजीच्या बळावर हिंगोलीला सर्व बाद ८६ च धावा करता आल्या. कौस्तुभ रेवगडेने २ तर सिद्धेश चव्हाण व नील चंद्रात्रेने प्रत्येकी १ गडी बाद केला . फॉलो ऑन नंतर दुसऱ्या डावात देखील अर्णव तांबटच्या ४ व सिद्धेश चव्हाणच्या ३ बळींच्या जोरावर हिंगोलीला सर्व बाद ८४ इतकीच मजल मारता आली. अथर्व सूर्यवंशीने २ व व्यंकटेश बेहरेनेहि १ गडी बाद करत नाशिकला मोठा विजय मिळवून दिला.इतर दोन सामन्यांत महात्मा नगर क्रिकेट मैदानावर जालनाने ज्युडिशियल विरुद्ध एक डाव व ३७ धावांनी मोठा विजय मिळवला.

संक्षिप्त धावफलक : जालना पहिला डाव २७५ – शौर्य जयस्वाल १५२ वि ज्युडिशियल पहिला डाव १११ – अनुराग बन ५ बळी व फॉलोऑन नंतर दुसरा डाव १२७ – आर्यन वाकडे ६ बळी )

तर एम सी सी मैदानावर स्पोर्टसमनने सी एन ए, विरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे गुण घेतले . ( संक्षिप्त धावफलक : स्पोर्टसमन पहिला डाव २४६ व दुसरा डाव ५ बाद ७५ सी एन ए पहिला डाव १७७ ).

Leave a Reply

Your email address will not be published.

X