नाशिकचा सेक्रेटरी इलेव्हनवर दणदणीत विजय

वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा: सत्यजितचे सात तर तन्मय शिरोडे,तेजस् पवारचे पाच बळी, यासर शेखची सुंदर खेळी

नाशिक-महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या अव्वल साखळी क्रिकेट स्पर्धेच्या ( एम सी ए सिनियर इन्विटेशन सुपर लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात, सणसवाडी पुणे येथे नाशिकने सेक्रेटरी इलेवन संघाविरुद्ध १ डाव व १०४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. उत्कृष्ट सांघिक कामगिरीचे प्रदर्शन करत नाशिक जिल्हा क्रिकेट संघाने सुपर लीग मध्ये लागोपाठ तिसरा निर्णायक विजय मिळवला.

सत्यजित,तेजस,तन्मयची दोन्ही डावात उत्तम कामगिरी

सेक्रेटरी इलेवनने पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली करताना ४० षटकांत १८३ धावा केल्या. यश बांबोळीने सर्वाधिक ४० धावा केल्या . नाशिकतर्फे तन्मय शिरोडेने ५ तर सत्यजित बच्छाव व यासर शेखने प्रत्येकी २ व तेजस पवारने १ बळी घेतला. नाशिकने ७९ व्या षटकांत ८ बाद ३४८ वर डाव घोषित करून पहिल्या डावात १६५ धावांची आघाडी घेतली. नाशिकतर्फे फलंदाजीत मुर्तुझा ट्रंकवालाने ७६ , शर्विन किसवेने ६५ तर कुणाल कोठावदे ४१ , यासर शेख ३९ आणि सिद्धार्थ नक्का व सत्यजित बच्छाव यांनी प्रत्येकी प्रत्येकी २५ धावांचे योगदान दिले. दुसऱ्या डावात तेजस पवार व सत्यजित बच्छावच्या फिरकीसमोर सेक्रेटरी इलेवन संघ अजिबातच टिकाव धरू शकला नाही. तेजस व सत्यजित दोघांनीही प्रत्येकी ५ बळी घेत २२.२ षटकांत ६१ धावांत डाव गुंडाळून नाशिकला दुसऱ्या दिवशी चहापाना पूर्वीच मोठा विजय मिळवून दिला.नाशिकच्या तन्मय शिरोडेने पहिल्या डावात ५ तर सामन्यात कर्णधार सत्यजित बच्छावने ७ व तेजस पवारने ६ बळी घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.

X