नाशिकची नगरवर १५८ धावांनी मात

वरिष्ठ महिला आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा प्रियंका घोडकेचे तडाखेबाज शतक,विजयात उचलला महत्वपूर्ण वाटा

नाशिक-महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय, वरिष्ठ महिला आमंत्रितांच्या अव्वल साखळी क्रिकेट ( इन्व्हिटेशन सुपर लीग ) स्पर्धेत , नाशिकने अहमदनगर संघावर १५८ धावांनी मोठा विजय मिळवला.

गरवारे मैदान , छ. संभाजी नगर ( औरंगाबाद ) येथे खेळताना प्रथम फलंदाजी मिळालेल्या नाशिकने कर्णधार प्रियांका घोडकेच्या जोरदार नाबाद १२८ धावांच्या बळावर ५० षटकांत ३ बाद २८२ धावा केल्या. प्रियांकाला माया सोनवणे ६० ची साथ मिळाली व दोघींनी १५८ धावांची भागीदारी केली. रसिका शिंदेने नाबाद ४० धावा केल्या. विजयासाठी २८३ धावांचा पाठलाग करतांना माया सोनवणे व ऐश्वर्या वाघच्या प्रभावी गोलंदाजी समोर अहमदनगर संघ ४५ . ४ षटकांत १२४ धावांपर्यंतच मजल मारु शकला. अहमदनगरच्या अंबिका वाटाडेने सर्वाधिक ४० धावा केल्या. माया सोनवणे व ऐश्वर्या वाघ या दोघींनी प्रत्येकी ४ तर प्रियांका घोडकेने २ बळी घेत नाशिकला १५८ धावांनी मोठा विजय मिळवून दिला .

पुढील सामना : २८ एप्रिल – नाशिक वि एम सी ए ब्ल्यु .

Leave a Reply

Your email address will not be published.

X