नाशिकची सिंधुदूर्गवर १ डाव,९ धावांनी दणदणीत विजय

वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा: यासर शेख १४२, तन्मय शिरोडेचे सामन्यात ६ बळी

नाशिक-महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या अव्वल साखळी क्रिकेट स्पर्धेच्या ( एम सी ए सिनियर इन्विटेशन सुपर लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात, नाशिकने सिंधुदुर्ग संघाविरुद्ध एक डाव व ९ धावांनी दणदणीत विजय मिळवला. शतकवीर यासर शेख, अर्धशतकवीर कर्णधार सत्यजित बच्छाव , सामन्यात ६ बळी घेणारा फिरकीपटु तन्मय शिरोडे यांनी विजयात महत्वपूर्ण वाटा उचलला.

पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केलेल्या सिंधुदुर्गला नाशिकने ४८.३ षटकांत १६० धावांत रोखले. पवन सानप व तन्मय शिरोडेने प्रत्येकी ३ तर तेजस पवार व प्रतीक तिवारीने प्रत्येकी २ गडी बाद केले. उत्तरादाखल सलामीवीर यासर शेखच्या जोरदार १४२ व कर्णधार रणजीपटू सत्यजित बच्छावच्या ५१ धावांच्या जोरावर ६१.३ षटकांत ९ बाद २९३ धावा करून १३३ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डावातहि तेजस पवार व तन्मय शिरोडेने प्रत्येकी ३ तर प्रतीक तिवारीने २ व यासर शेख आणि पवन सानपने प्रत्येकी १ बळी घेऊन सिंधुदुर्गला ३३.२ षटकांत १२४ धावांत गुंडाळून नाशिकला मोठा विजय मिळवून दिला.

Leave a Reply

Your email address will not be published.

X