राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा ( १६ वर्षांखालील ): स्पोर्टसमनचा निर्णायक विजय , हिंगोलीला आघाडीचे गुण

नाशिक- येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, राज्यस्तरीय १६ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( एम सी ए इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात नाशिकने सी एन ए वर पहिल्या डावातील आघाडीचे गुण घेतले.
एम सी सी, मेरी मैदानावर प्रथम फलंदाजी करत सी एन एने भावेश बारडियाच्या ७२ धावांच्या जोरावर १५३ धावा केल्या. नाशिकतर्फे नील चंद्रात्रेने प्रभावी गोलंदाजीचे प्रदर्शन करत ६ बळी घेतले. व्यंकटेश बेहरे व कौस्तुभ रेवगडेने प्रत्येकी १ गडी बाद केला. उत्तरादाखल नाशिकने नवव्या क्रमांकावरील यष्टिरक्षक विदुर मौलेच्या जबाबदार ४४ व त्यास दहाव्या क्रमांकावरील हुजेफा मरचंट नाबाद ३४ च्या मिळालेल्या साथीने ५९ धावांची महत्वपूर्ण भागीदारी करत एकूण १६२ धावा करून पहिल्या डावात आघाडी घेतली, ध्रुव एखंडेने २९ धावा केल्या. कर्णधार आदित्य भटने ५ बळी घेतले. दुसऱ्या डावात सी एन एने ६ बाद २२१ धावा करत विजयासाठी नाशिकला २१३ धावांचे लक्ष्य दिले. आदित्य भटने आबाद १०० व भावेश बारडियाने ८६ धावा केल्या. कौस्तुभ रेवगडेने ४ व नील चंद्रात्रेने २ बळी घेतले. दिवसअखेर सामना संपेपर्यंत नाशिकने ४ बाद ११२ इतकी मजल मारली . नील चंद्रात्रेने नाबाद ४३ व ध्रुव एखंडेने ३० धावा केल्या . या अनिर्णित सामन्यात नाशिकने सी एन एवर पहिल्या डावातील आघाडीचे गुण घेतले .
हिंगोलीचे जालनाविरूध्द आघाडीचे गुण
इतर दोन सामन्यांत हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर हिंगोलीने जालना विरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे गुण घेतले. तर ए एस के क्रिकेट मैदानावर स्पोर्टसमनने ज्युडिशियल वर एक डाव व २०४ धावांनी विजय मिळवला.
( संक्षिप्त धावफलक : हिंगोली पहिला डाव २७३ – सौरव बिराजदार १२३,सुमित सोळुंके ९८ ,आयुष राय ६ बळी व दुसरा डाव ६ बाद २६६ – सौरव बिराजदार ९७ वि जालना पहिला डाव १८७ ).
( संक्षिप्त धावफलक : स्पोर्टसमन पहिला डाव ५ बाद ३४२ – संस्कार सोनवणे नाबाद १५०. ज्युडिशियल पहिला डाव सर्वबाद ६८ – ऋग्वेद सी चे ६ बळी व फॉलोऑन नंतर दुसरा डाव सर्वबाद ७० – ऋग्वेद सी चे ६ बळी ).