नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा उपक्रम: आपले कौशल्य,गुणवत्ता दाखवण्याची संधी,नामांकित प्रशिक्षकांचे मार्गदर्शन,संवाद साधता येणार

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे सालाबादप्रमाणे यंदाही २० एप्रिल ते ३१ मे या कालावधीत क्रिकेट टॅलेन्ट सर्च कॅम्प घेण्यात येणार आहे. अनंत कान्हेरे मैदान( गोल्फ क्लब व महात्मानगर क्रिकेट मैदान) येथे टॅलेन्ट सर्च कॅम्प चालणार आहे.
या कॅम्प मध्ये ७ वर्षांपासून पुढील वयाच्या खेळाडूंना प्रवेश दिला जाणार आहे. या क्रिकेट कॅम्प मध्ये खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेत वाढ करण्याबरोबरच क्रिकेट खेळा मधील विविध गुण आत्मसात करणे , त्यांचा विकास करणे या उद्देशाने खेळाडूंना विविध व्यायामाचे प्रकार , क्रिकेटमधील विविध प्रकारांचा प्रत्यक्ष सराव करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल . त्यासाठी ह्या प्रशिक्षण शिबिरात नामवंत आजी, माजी ज्येष्ठ क्रिकेटपटू , रणजीपटू , तसेच महाराष्ट्र क्रिकेट असो. मध्ये महाराष्ट्राच्या विविध वयोगटातील संघाना मार्गदर्शक म्हणून काम करणारे नाशिकचे मार्गदर्शक प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
नामांकिताचे लाभणार मार्गदर्शन
कॅम्पच्या वेळा सकाळी ६.३० ते ८.३० व दुपारी ४.३० ते ६.३० अशा असतील . शिबिरातील खेळाडूंना विविध वयोगटातील कै. चंद्रशेखर शिंदे , व्ही. पी. बागुल सारख्या स्पर्धांत सहभागी व्हायची संधी मिळणार असून, चांगली कामगिरी केलेल्या गुणवान खेळाडूंचा पारितोषिक देऊन सन्मान केला जाईल. तसेच टॅलेन्ट सर्च कॅम्प मधील गुणवान खेळाडूंची पारख करून. असो. च्या वर्षभर दररोज चालणाऱ्या सराव शिबिरात त्यांचा समावेश केला जाणार आहे. तसेच त्यांचा विविध वयोगटातील जिल्हा संघांसाठीही विचार केला जातो. या टॅलेन्ट सर्च कॅम्प च्या नाव नोंदणी साठीचे फॉर्म अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथील एन डी सी ए च्या कार्यालयात रोज सकाळी ९ ते ११ व दुपारी ४.३० ते ६.३० ह्या वेळात उपलब्ध आहेत.
तरी या संधीचा जास्तीतजास्त इच्छुक खेळाडूंनी लाभ घ्यावा असे आवाहन नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे करण्यात येत आहे .