पंचवटी चॅम्पियन, एन सी ए,एच ए एल ची आगेकूच

हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी सुयश यादव,समाधान पांगारे,सौरभ भगतची भेदक गोलंदाजी

नाशिक- जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित मेसन ट्रेडर्स व मेसन डेव्हलपर्स पुरस्कृत हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीच्या खुल्या गटात सातव्या दिवशी पंचवटी चॅम्पियन, एन सी ए व एच ए एल यांनी आपले पहिले सामने जिंकत आगेकूच केली आहे.

पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून नाशिक जिमखाना बी ने प्रथम फलंदाजी करत एन सी ए विरुद्ध सर्वबाद १२३ धावा केल्या. असिफ सय्यदने सर्वाधिक ४५ तर ध्रुव शाहने २२ धावा केल्या. एन सी एच्या सुयश यादवने ५ व प्रणव पवारने २ गडी बाद केले. उत्तरादाखल एन सी ए ने ४ गडी गमावत १२४ धावा केल्या. साहिल पारखने ४७ व रविंद्र मत्च्याने नाबाद ३५ धावा करत एन सी एला ६ गडी राखून आरामात विजयी केले.

समाधानने धाडले सहा गडी तंबुत

दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून सिन्नर क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करत एच ए एल विरुद्ध सर्वबाद १२२ धावा केल्या. सिन्नरच्या सागर कराडने सर्वाधिक ३४ धावा केल्या. तर प्रसाद खिराडकरने २६ धावा केल्या. एच ए एलच्या समाधान पांगारेने आपल्या भेदक गोलंदाजीने ६ गडी तंबूत पाठवले. विजयासाठीच्या १२३ धावा एच ए एलने ३ गडी गमावत पार केल्या. त्यात अखिल शेखने नाबाद ४५ व योगेश राजदेवने २७ धावांचे योगदान देत एच ए एलला ७ गडी राखून सहज विजयी केले.

सात गडी राखत पंचवटी चॅम्पियनचा विजय

त्या अगोदर सहाव्या दिवशी झालेल्या एकमेव सामन्यात पंचवटी चॅम्पियनने एफ सी सी ए वर सात गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत एफ सी सी एने सर्वबाद १९० धावा केल्या. रितेश शर्माने सर्वाधिक ३८ धावा केल्या. तर अजय महालेने २५ धावा केल्या. पंचवटी चॅम्पियनच्या सौरभ भगतने आपल्या जोरदार गोलंदाजीने ६ गडी टिपले. विजयासाठीच्या १९१ धावा सलामीवीर रीतविक जावळे ६२ व गौरव पाटील नाबाद ५३ यांच्या फलंदाजीच्या जोरावर ३ गडी गमावत पार केल्या व ७ गडी राखून मोठा विजय मिळवला.

Leave a Reply

Your email address will not be published.

X