पंचगिरीत रमणारा अवलिया ” प्रदीप गायधनी”

दीड हजारांपेक्षा अधिक सामन्यांमध्ये पंचाचे काम: वयाच्या साठीनंतरही न थकता कष्ट सुरुच, फिटनेस कायम ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्न

क्रिकेट हा खेळ म्हटला की डोळ्यासमोर येतो फक्त बॅट आणि चेंडू. बहुतेकांचे लक्ष किंवा खेळाडू होण्याकडे असते. मात्र याही व्यतिरिक्त थोडी दुसरीकडे नजर टाकली तर समालोचक, क्युरेटर, स्कोरर या भूमिका करणारेही बरेच जण आहेत. या भूमिकेशिवाय क्रिकेट पुढे जाऊ शकत नाही. त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हटला तर अंपायरिंग हा म्हणता येईल. टीव्हीवर आपण न्यूझीलंडचे पंच बिली बॉंडेन, भारताच्या अनिल चौधरी, एस. वेंकटराघवन यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहिले आणि पाहत आहोत मात्र स्थानिक स्तरावर असेच एक अंपायर अर्थात नाशिकचे पंच प्रदीप गायधनी यांच्याबाबत म्हणता येईल….(नाना खैरनार)

नाशिकचे सर्वात जुने जाणते पंच म्हणून प्रदीप गायधनी हे होय. गायधनी हे गेल्या 30 वर्षापासून मैदानावर पंच म्हणून काम पाहत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी जवळजवळ दीड हजार सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिले आहे. हे काम पाहत असताना त्यांना 50 50 षटकाचे सामने ही करावी लागतात. हे सामने दिवसभर चालतात, म्हणजेच जवळजवळ सात ते आठ तास मैदानावर उभे राहावे लागते. त्यासाठी फिटनेसही हवा असतो. वयाची साठी गाठविल्यानंतर गायधनी हे न थकता मैदानावर उभे राहिलेले दिसतात . हा फिटनेस कायम ठेवण्यासाठी दररोज त्यांना पण अर्धा तास वॉकिंग करावी लागते. हे सर्व करत असताना क्रिकेटमधला आनंद अजूनही कमी झालेला नाही.

न थकता चोखपणे काम बजावणारे आदर्शवत पंच
नाशिक, औरंगाबाद ,धुळे ,शिरपूर या ठिकाणी त्यांनी अंपायरिंग केली आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा 2007 आणि 2019 चा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. गायधनी हे अंपायरिंगमध्ये माधव गोरस्कर आणि एस व्यंकटराघवन यांना आपला आदर्श मानतात. या आंतरराष्ट्रीय अंपायरला पाहूनच आपण पंच म्हणून सुरुवात केल्याचे ते सांगतात.

मैदानात उभे राहायचे म्हणजे ताण तणावाला सामोरे जावे लागते. आठवणीतल्या सामने विषय ते म्हणतात, एकदा सेक्रेटरी 11 आणि डी वाय पाटील इलेव्हन यांच्यात सामना झाला. या सामन्यात दोन्ही बाजूंनी रणजी खेळाडू होते.त्यावेळी एखादा जरी निर्णय चुकला असता तर वेगळच झाले असते. मात्र मनावर संयम ठेवत आणि जो काही निर्णय होता तो योग्यच दिल्यामुळे दोन्ही संघातील खेळाडू खुश झाले. त्यांनी माझ्या अंपायरिंगविषय कौतुक केले. गायधनी यांनी आतापर्यंत राज्यस्तरावरच्या जवळजवळ 80 ते 90 सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिले आहे. वयाची साठी पार केली असली तरी अद्यापही मी सात ते आठ वर्ष नक्कीच अंपायरिंग करेल असं त्यांना विश्वास वाटतो.


असा झालो पंच

मी शाळेत असताना मला क्रिकेट विषयी आवड होती.त्यामुळे नाशिकच्या पोलीस ग्राउंडवर सुरू असलेले सामने पाहायला जायचो. यातूनच माझी क्रिकेटची आवड अधिकच वाढली. मी मराठा हायस्कूलमध्ये असताना शाळेकडून दोन वर्ष क्रिकेट खेळलो. त्यानंतर केटीएचएम कॉलेजमध्ये मी शिकत असताना या महाविद्यालयाकडून सामने खेळले. वय वाढत गेल्यानंतर आपल्याला क्रिकेटमध्ये टिकून राहायचे आहे असे मी मनाशी ठरवले. त्यानंतर 1992 -93 मध्ये मी अंपायरिंगला सुरुवात केली अनेक वर्ष लोटल्यानंतरही ती अद्यापही करीत आहे. यावेळी मला एनडीसीएचे विनोद शहा आणि सचिव समीर रकटे,रतन कुयटे,सर्वेश देशमुख यांच्यासह सर्व सहकाऱ्यांचे सहकार्य मिळाले. त्यामुळेच मी अंपायरिंग करू शकलो.
प्रदीप गायधनी

पंच, एनडीसीए, नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published.

X