राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा ( १९ वर्षांखालील -किसवे,कुलकर्णी, दिंडे यांची उत्कृष्ठ खेळी, सिंग,मोरे,रावळ ही चमकले

नाशिक- येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, राज्यस्तरीय १९ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( एम सी ए इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात पारसी जिमखानाने नाशिक विरुद्ध, हिंगोलीने सातारावर व यूनायटेडने श्री साई युवा क्रिकेट अकादमी विरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे गुण घेतले .
महात्मा नगर क्रिकेट मैदानावर पहिल्या दिवशी नाशिकने प्रथम फलंदाजी करताना ४५.३ षटकांत १८० धावा केल्या. दीर्घ ब्रम्हेचाने सर्वाधिक ५४, हुजैफ शेखने ३४ व प्रसाद दिंडेने २२ धावा केल्या . पारसी जिमखानाच्या ऋषिकेश फुलेने ५ बळी घेतले. पारसी जिमखानाने २२१ धावा करत ३७ धावांची आघाडी घेतली. अभिजीत नागरगोजेने सर्वाधिक ७५ , ओम पवारने ४७ व यशवंत काळेने ३१ धावा केल्या. प्रतीक तिवारीने ४ तर हुजैफ शेख व गुरमान सिंग रेणुने प्रत्येकी २ बळी घेतले. दुसऱ्या डावात शर्विन किसवे ४८ , केयूर कुलकर्णी ३३ व प्रसाद दिंडे नाबाद ३२ यांनी नाशिकला १४० पर्यंत नेले. यशवंत काळेने ५ व ओम पवारने ३ बळी घेतले. दुसऱ्या डावात पारसी जिमखानाच्या विजयासाठी १०४ पैकी २ बाद ४५ धावा झाल्यावर सामना अनिर्णित अवस्थेत संपला.
इतर दोन सामन्यांत संदीप फौंडेशनच्या मैदानावर यूनायटेडने श्री साई युवा क्रिकेट अकादमी वर पहिल्या डावातील आघाडीचे गुण घेतले .
संक्षिप्त धावफलक : यूनायटेड पहिला डाव ७ बाद २५३ – हर्षवर्धन टिंगरे ७५ वि श्री साई युवा क्रिकेट अकादमी – पहिला डाव १०९ – व्यंकटेश मानवेलीकर ४७ , निमिर जोशी ५ व माहिर रावळ ४ बळी आणि फॉलोऑन नंतर दुसरा डाव ७ बाद १६१ – स्वरूप मोरे ५८ , माहिर रावळ ५ बळी).आणि एस एस के मैदानावर हिंगोली ने सातारा वर पहिल्या डावातील आघाडीचे गुण घेतले .
संक्षिप्त धावफलक : हिंगोली पहिला डाव २१६ – ओमकार मोगल ११३ ,प्रणय टी ३९ , अथर्व पवार ६ व यशराज मदाने ३ बळी व दुसरा डाव ८ बाद १९० – निशांत जोशी नाबाद ५३ , योगेश चव्हाण ४३, यशराज मदाने ३ बळी वि सातारा पहिला डाव १५८ – संग्राम सिंग नारळे ३३ , हिमांशु ४ बळी व दुसरा डाव ९ बाद ११५ – ओमकार गायकवाड ४१ , निशांत जोशी ४ बळी ).