सुपरलिगसाठी नाशिक संघाची घोषणा,प्रियंका घोडके करणार नेतृत्व

वरिष्ठ महिला आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा: रसिका शिंदे बनली उपकर्णधार,चांगल्या कामगिरीची अपेक्षा

नाशिक-महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय, वरिष्ठ महिला आमंत्रितांच्या अव्वल साखळी क्रिकेट ( इन्व्हिटेशन सुपर लीग ) स्पर्धेसाठी , नाशिक वरिष्ठ महिला जिल्हा संघ जाहीर करण्यात आला आहे. प्रियांका घोडकेवर कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तर रसिका शिंदे उपकर्णधार असेल.

ईश्वरी सावकार व शाल्मली क्षत्रिय एनसीए कॅम्प ला गेल्या आहेत.

नाशिक महिला संघ :

१- प्रियांका घोडके – कर्णधार ,२ – रसिका शिंदे – उप कर्णधार , ३ – तेजस्विनी बाटवाल – यष्टिरक्षक, ४- माया सोनवणे, ५ – साक्षी कानडी, ६ – लक्ष्मी यादव , ७ – पूजा वाघ , ८- प्रचिती भवर, ९ – दिव्या गायकवाड, १०- आस्था संघवी , ११ – अपूर्वा रोकडे , १२ – श्रुति गीते, १३ – इशानी वर्मा , १४ – ऐश्वर्या वाघ .

राखीव : १५ – निकिता मोरे, १६ – वैभवी बालसुब्रमण्यम १७ – धनश्री काकड.

प्रशिक्षक : भावना गवळी

छ. संभाजी नगर येथे २५ एप्रिल ते १ मे दरम्यान हि एकदिवसीय स्वरूपाची स्पर्धा होत आहे. नाशिक संघाचा एकूण पाच संघांच्या अ गटात समावेश आहे.

शर्मिला साळी , भावना गवळी , सुनील मालुसरे व डॉ. भाविक मंकोडी यांच्या निवड समितीने या १७ खेळाडूंच्या चमूची निवड जाहीर केली .

Leave a Reply

Your email address will not be published.

X