डीव्हीसीएसला नाशिकविरूध्द आघाडीचे गुण

राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा: ओम भाबडचे तडाखेबाज द्विशतकांच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारण्यास मदत

नाशिक- पुणे येथील व्हेरॉक क्रिकेट मैदानावर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय १९ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या अव्वल साखळी क्रिकेट ( इन्व्हिटेशन सुपर लीग ) स्पर्धेत, दोन दिवसीय कसोटी सामन्यात डी व्ही सी एसने नाशिक विरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे गुण घेतले. .

प्रथम फलंदाजी मिळालेल्या डी व्ही सी एसला पहिल्या डावात नाशिकच्या गोलंदाजांनी १३२ धावांत रोखले . नाशिकतर्फे रोहन शेडगे व हुजैफ शेखने प्रत्येकी ४ व गुरमान सिंग रेणुने २ गडी बाद केले.पण डी व्ही सी एसच्या गोलंदाजांनीहि नाशिकला ११४ धावांत सर्वबाद करत पहिल्या डावात आघाडी घेतली. कर्णधार शर्विन किसवेने सर्वाधिक २८,साहिल पारेखने २४ व केयूर कुलकर्णी ने २१ धावा केल्या.अक्षम कडलगने ५ व ओमकार राजपूतने ४ बळी घेतले. डी व्ही सी एसने दुसऱ्या डावात ओम भाबड च्या जोरदार २०३ धावांच्या जोरावर ४३६ धावा केल्या. गुरमान सिंग रेणुने सर्वाधिक ३ गडी बाद केले. दुसऱ्या डावात नाशिकने बिनबाद ६२ धावा केल्या. या अनिर्णित सामन्यात डी व्ही सी एसने नाशिक विरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे गुण घेतले

पुढील सामना : १९ मे : युनायटेड .

Leave a Reply

Your email address will not be published.

X