नाशिक,पुण्याचा प्रतिस्पर्ध्यांवर दणदणीत विजय

महिलांच्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा ( १९ वर्षांखालील )– वैभवी बालसुब्रमण्यम्, इशामी वर्मा,श्रृती गीते,सिध्दी पिंगळे यांची विशेष कामगिरी

नाशिक- येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय, १९ वर्षांखालील महिलांच्या आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट ( इन्व्हिटेशन लीग ) स्पर्धेत पावसामुळे प्रभावित सामन्यात नाशिकने रत्नागिरी वर ६ गडी राखून तर पुणेने धुळेवर १० गडी राखून मोठा विजय मिळवला .

१९ वर्षांखालील महिलांच्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट स्पर्धा ( इन्व्हिटेशन लीग ) एक दिवसीय स्वरूपात नाशिक येथे होत आहेत. नाशिकचा समावेश अ गटात असून रत्नागिरी ,पुणे व धुळे हे इतर संघ आहेत.

महात्मानगर मैदानावर नाशिक विरुद्ध रत्नागिरीने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत ५ बाद १६८ धावा केल्या. महेक हुर्णेकरने ५२ व प्रांजल पवारने ४२ धावा केल्या. अवांतर ३३. नाशिकच्या वैभवी बालसुब्रमणीयमने २ तर सिद्धि पिंगळे, श्रुती गीते व इशानी वर्माने प्रत्येकी १ बळी घेतला. उत्तरादाखल नाशिकच्या १४.५ षटकांत ४ बाद ९१ धावसंख्येवर पावसामुळे सामना थांबवावा लागला. त्यामुळे त्यानंतर बदललेले १०२ धावांचे लक्ष्य नाशिक संघाने १७.३ षटकांत सहजपणे पार करत ६ गडी राखून विजय मिळवला. नाशिकच्या इशानी वर्माने २४ व श्रुती गीते नाबाद २२ धावा केल्या. अवांतर ३७. रत्नागिरीच्या प्रांजल पवारने २ व महेक हुर्णेकरने १ बळी घेतला.

पुण्याचा दहा गडी राखून मोठा विजय

दुसऱ्या सामन्यात एस एस के मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या धुळे संघाला पुणेने केवळ १८.३ षटकांत ४६ धावांत गुंडाळले. नेहा चव्हाणने ११ धावा केल्या. पुण्याच्या कृतिका चौधरीने ४, अक्षया जाधवने ३ , शिवांशी कपूरने २ व प्रांजली पिसेने १ बळी घेतला. विजयासाठीच्या ४७ धावा , प्रांजली पिसे नाबाद २२ व राशी व्यास नाबाद २० यांनी ९.१ षटकांतच फटकावून पुण्याला १० गडी राखून मोठा विजय मिळवून दिला.

Leave a Reply

Your email address will not be published.

X