आर.व्ही.स्पोर्टस्,मोठेबाबा संघ विजयी

हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी:उज्वल जैनचे पाच बळी,केयूर कुलकर्णीच्या ४२ धावा,श्रीकांत खडेची ६८ धावांची खेळी

नाशिक- जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित, मेसन ट्रेडर्स व मेसन डेव्हलपर्स पुरस्कृत हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीच्या खुल्या गटात हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर दहाव्या दिवशी आर व्ही स्पोर्ट्स व मोठेबाबाने यांनी आपले सामने जिंकले.

पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून नाशिक हंडीकॅप संघ प्रथम फलंदाजी करताना आर व्ही स्पोर्ट्सच्या गोलंदाजांसमोर सर्वबाद ८० च धावा करू शकले. विशाल लहानेने सर्वाधिक २३ धावा केल्या. आर व्ही स्पोर्ट्सच्या उज्ज्वल जैनने ५ तर सिद्धेश चव्हाण व सर्वेशने प्रत्येकी २ गडी बाद केले. विजयासाठीच्या ८१ धावा सलामीवीर केयूर कुलकर्णीच्या ४२ धावांच्या जोरावर पार करत आर व्ही स्पोर्ट्सने ७ गडी राखून विजय मिळवला.

दुसऱ्या सामन्यात मोठेबाबाने येवलाला प्रथम फलंदाजी दिलयावर ३०३ धावा केल्या. त्यात कपिलने ४९, सोमनाथ सोनवणे ४२ , अजय पारखे नाबाद ३९ , पियुष नगपुरे ३६ व पवन संतने ३५ धावा करत प्रमुख वाटा उचलला. उत्तरादाखल मोठेबाबाने सलामीवीर सुमित आव्हाडच्या जोरदार नाबाद १३३ धावांच्या जोरावर ६ गडी राखून विजय मिळवला. त्यास श्रीकांत खाडे नाबाद ६८ व कार्तिक आव्हाड ३५ यांची साथ मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published.

X