एस जी सी ए,सनराइज संघाची प्रतिस्पर्ध्यांवर सहज मात

हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी: शिवम स्वामी,राहुल पाटील यांची दमदार फलंदाजी,सूरज पवार,यश गाडे,समीर कुलकर्णी,सचिन आहेरची चांगली गोलंदाजी

नाशिक- नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित, मेसन ट्रेडर्स व मेसन डेव्हलपर्स पुरस्कृत हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीच्या खुल्या गटात हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर नवव्या दिवशी एस जी सी ए व सनराइज यांनी आपले सामने जिंकले .

पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून एन एम सी ने एस जी सी ए ला प्रथम फलंदाजी दिली. एस जी सी एने ७ बाद २७० धावा केल्या. त्यात शिवम स्वामी ने ७३ ,राहुल पाटील ७० व अमन शर्माने ४२ धावा केल्या. शुभम देवांग व शुभम बीडगरने प्रत्येकी २ गडी बाद केले. उत्तरादाखल एन एम सीला १२१ पर्यंतच मजल मारता आली. शुभम बीडगरने ३२ धावा केल्या . सूरज पवार व यश गाडे ने प्रत्येकी ३ व शिवम स्वामी ने २ बळी घेत एस जी सी एनला १४९ धावांनी विजयी केले.

सनराइची द्विशतकी खेळी

दुसऱ्या सामन्यात ईलेवन ब्रदर्स ने नाणेफेक जिंकून सनराइजला प्रथम फलंदाजी दिली. सनराइजने प्रमोद शिरसाठ ४० , राजन शिंदे ३१ व सनी काकडे २७ यांच्यामुळे २२२ धावा केल्या. ईलेवन ब्रदर्सच्या नाना ढोमसे व दीपक पवार ने प्रत्येकी ३ गडी बाद केले. उत्तरादाखल ईलेवन ब्रदर्सला १६४ पर्यंतच मजल मारता आली. मुकेश नागरेने सर्वाधिक २७ धावा केल्या. सन राइजच्या समीर कुलकर्णीने ४, सचिन आहेर ३ व समीर काळेने २ बळी घेत संघाला ५८ धावांनी विजय मिळवून दिला व एफ गटात दोन विजयांच्या जोरावर प्रथम स्थान मिळवले.

Leave a Reply

Your email address will not be published.

X