`बीसीसीआय` च्या एनसीए स्पर्धेसाठी `शाल्मली क्षत्रिय`ची निवड

नाशिक- नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या शाल्मली क्षत्रियची हिची, मुलींच्या १९ वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी – एन सी ए – च्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

एन सी ए अंतर्गत हि स्पर्धा २१ ते ३१ मे दरम्यान राजकोट येथे होत आहे. अष्टपैलु शाल्मली क्षत्रियची रांची येथील १७ एप्रिल ते ११ मे २०२३ दरम्यान झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील एन सी ए शिबिरात निवड झाली होती .माजी कसोटीपटू व्हि व्हि एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एन सी ए, बेंगळुरू तर्फे भारतभरातील उदयोन्मुख , होतकरू खेळाडूंसाठी हे शिबीर झाले. विविध स्पर्धेतील लक्षणीय कामगिरीच्या जोरावर हि निवड होते. शाल्मली बरोबरच महाराष्ट्राच्या आचल आगरवाल व के एन मुल्ला या दोघींचीही यासाठी निवड झाली आहे.राष्ट्रीय पातळीवरील या महत्वाच्या स्पर्धेसाठी झालेल्या निवडीबद्दल, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाल्मलीचे खास अभिनंदन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

X