एफ सी सी बी,सनराइज संघाचे सहज विजय

हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी: समीर कुलकर्णीचे दमदार शतक, समीर काळे, राजन शिंदेचे उत्कृष्ठ खेळी

नाशिक- नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित, मेसन ट्रेडर्स व मेसन डेव्हलपर्स पुरस्कृत हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीच्या खुल्या गटात हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर चौथ्या दिवशी एफ सी सी बी व सनराइजने यांनी आपले सामने जिंकले.

पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून एफ सी सी बीने प्रथम फलंदाजी करत अंजनी अकादमी विरुद्ध ४६.१ षटकांत १९४ धावा केल्या. चंदन साहने सर्वाधिक ४५ धावा केल्या. अंजनीच्या तुषार दाते व राकेश सिंग यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. उत्तरादाखल संदीप जाधवच्या ५ बळींमुळे अंजनी संघ १३३ पर्यंतच मजल मारू शकल्याने एफ सी सी बी ६१ धावांनी विजयी झाले व आपला दुसरा विजय नोंदवला. अंजनीच्या तेजस कोकणेने सर्वाधिक २६ धावा केल्या.

समीरच्या खेळीने वेधले लक्ष

दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून सनराइजने क्रिसेंट विरुद्ध प्रथम फलंदाजी करत शतकवीर समीर कुलकर्णी १०४ , समीर काळे ८० व राजन शिंदे ६५ यांच्या फलंदाजीच्या जोरावर ४८.५ षटकांत ३४६ धावा केल्या. क्रिसेंटच्या निशांत भावसारने ३ गडी बाद केले. उत्तरादाखल क्रिसेंट संघ १९६ पर्यंतच मजल मारू शकल्याने सनराइज १५० धावांनी विजयी झाले. क्रिसेंटतर्फे रोहित प्रतीकेने सर्वाधिक ५६ धावा केल्या. सनराइजनच्या समीर काळे ने ४ गडी बाद केले.

सामने पाहण्याची सुवर्ण संधी

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन – एन डी सी ए – ची डिजिटल सहयोगी स्पोर्टवोट, मुंबई ने नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथील सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण प्रसारण सुरू केले आहे. स्पोर्टवोट हे अॅप डाउनलोड करून सर्व क्रीडाप्रेमी या सामन्यांचा आनंद कोठूनही थेट घेऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published.

X