
नाशिक-हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी बरोबर एन डी सी ए चा ऐतिहासिक डिजिटल अध्याय सुरु होत आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना – एन डी सी ए – २०२२-२३ हे ५० वे – सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करीत आहे. त्यानिमित्ताने या हंगामात जिल्हा क्रिकेट संघटना विविध नवनवीन उपक्रम हाती घेतले आहेत . त्यात सध्याच्या सायबर , इंटरनेट व डिजिटल युगाला साजेशे असे अजून एक अतिशय महत्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले आहे. ते म्हणजे नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सर्व सामन्यांचे थेट – live – प्रक्षेपण करण्यास या स्पर्धेपासून शुभारंभ झाला आहे. स्पोर्टवोट, मुंबई ने नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथील सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण प्रसारण सुरू केले आहे. स्पोर्टवोट हे अँप डाउनलोड करून सर्व क्रीडाप्रेमी या सामन्यांचा आनंद कोठूनही थेट घेऊ शकतात. एन डी सी ए ची डिजिटल सहयोगी स्पोर्टवोट, मुंबई नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण करेल आणि स्पोर्टवोट,एन.डी.सी.ए अंतर्गत सर्व खेळाडूंची प्रोफाइलिंग करणार आहे सामन्याचा आनंद घेण्याची ही एक सुवर्णसंधी क्रिकेटरसिकांनी एनडीसीए ने प्राप्त करून दिली आहे. ही काही निवडक क्षणचित्रे आपल्यासाठी