
नाशिक- नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा सुवर्ण महोत्सव नुकताच पार पडला. हा सुवर्ण महोत्सवी समारंभ व सोवेनियर प्रकाशन आय सी सी व बी सी सी आय चे माजी अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या हस्ते २५ फेब्रवारीला होणार होते. पण काही अपरिहार्य कारणामुळे श्री. पवार हे या कार्यक्रमास येऊ शकले नव्हते . आज विविध कार्यक्रमांनिमित्ताने श्री.पवार हे नाशिक दौऱ्यावर आले असता नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे सुवर्ण महोत्सवा निमित्त त्यांची खास भेट घेऊन सन्मान चिन्ह व सोवेनियर प्रदान करण्यात आले. यावेळी सुवर्ण महोत्सव समितिचे अध्यक्ष विलाभाऊ लोणारी , नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन विनोद शहा ,सचिव समीर रकटे , सहसचिव योगेश ( मुन्ना ) हिरे व चंद्रशेखर दंदणे आणि हेमंत टकले व शिवदास डागा उपस्थित होते. याच भेटीप्रसंगीची काही क्षणचित्रे खास आमच्या क्रिकेटरसिकांसाठी…



