महाराष्ट्राच्या २५ वर्षाखालील क्रिकेट संघासाठी निवडः अनुभव,सरावाचा नक्कीच सर्वांना मिळणार फायदा

नाशिक-नाशिकचे विनोद यादव यांची पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या २५ वर्षाखालील क्रिकेट संघासाठी फिजिकल ट्रेनर पदी निवड झाली आहे. नुकत्याच संपलेल्या , मागील २०२२ – २३ हंगामासाठी देखील महाराष्ट्राच्या २५ वर्षाखालील क्रिकेट संघासाठी फिजिकल ट्रेनर म्हणून काम बघितले होते. महाराष्ट्र संघाने बीसीसीआय च्या सी के नायडू ट्रॉफी स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी करत उपउपांत्य फेरी पर्यन्त मजल मारली होती.
यापूर्वी विनोद यादव यांनी १६ व २३ वर्षांखालील महाराष्ट्र संघाचे ट्रेनर पद भूषविले होते. विनोद यादव गेल्या चार वर्षांपासून नाशिक क्रिकेट संघटनेच्या पुरुष व महिला खेळाडूंना शारीरिक तंदुरुस्तीसाठी मार्गदर्शन करीत आहेत.येत्या २०२३ -२४ हंगामासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे , सचिव सुरेन्द्र भांडारकर यांनी पुणे येथे हि नेमणूक जाहीर केली.नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेशी संबंधित सात जणांची यापूर्वीच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन – एम सी ए – वर विविध महत्वाच्या पदांवर निवड झाली आहे. विनोद यादव यांच्या या निवडी बद्दल , नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.