वायसीए,सेव्हन स्टारची प्रतिस्पर्ध्यांवर सहज मात

हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी

नाशिक- नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित, मेसन ट्रेडर्स व मेसन डेव्हलपर्स पुरस्कृत हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीच्या खुल्या गटात हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर अकराव्या दिवशी वाय सी ए व सेव्हन स्टार यांनी आपले सामने जिंकले.

पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मंडलिक क्रिकेट क्लबने १७६ धावा केल्या. सिद्धार्थ राऊतने सर्वाधिक नाबाद ४० धावा केल्या. सेव्हन स्टारच्या शुभम शिंदेने ३ गडी बाद केले. विजयासाठीच्या १७७ धावा सेव्हन स्टारने ७ गडी गमावून केल्या. त्यात अनिकेत पवारने सर्वाधिक नाबाद ५० तर श्रीकांत रावने २६ धावा करत सेव्हन स्टारला ३ गडी राखून विजयी केले. मंडलिक क्रिकेट क्लबच्या सुयोग मंडलिक व तन्मय चौहानने प्रत्येकी ३ गडी बाद केले.

तन्मयची भेदक गोलंदाजीवर

दुसऱ्या सामन्यात वाय सी एने ब्राइट ऑटोला प्रथम फलंदाजी देत तन्मयच्या ५ बळींच्या जोरावर ११८ धावांत रोखले. सेलवा पंडीने २ गडी बाद केले. ब्राइट ऑटोच्या अविनाश रौनदळने सर्वाधिक २४ धावा केल्या. ऋषिकेश कुलथेच्या ६१ धावांच्या जोरावर वाय सी एने ४ गडी राखून विजय मिळवला. मनमोहन डंकने ३५ धावा केल्या. ब्राइट ऑटोच्या विशाल टिळेकरने ३ गडी बाद केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

X