महिलांच्या राज्य स्पर्धेत पुण्याला जेतेपद,नाशिक उपविजेता

महिलांच्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा: तीन सामने जिंकत पुण्रयाची बाजी,रत्नागिरीही अजिंक्य, कार्तिकी,श्रृती चमकल्या,सईकरचे तीन तर जाधवचे दोन बळी

नाशिक- महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय, १९ वर्षांखालील महिलांच्या आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट ( इन्व्हिटेशन लीग ) स्पर्धेत पुणे संघाने नाशिकवर ४ गडी राखून तर रत्नागिरीने धुळ्यावर ८ धावांनी मात करत जेतेपद पटकावले, या स्पर्धेत नाशिक उपविजेता ठरला.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणर्‍या १९ वर्षांखालील महिलांच्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट स्पर्धा ( इन्व्हिटेशन लीग ) एक दिवसीय स्वरूपात नाशिक येथे झाली . रत्नागिरी , पुणे व धुळेसह नाशिकचा अ गटात समावेश होता. तीनही सामने जिंकून पुणे संघाने गट विजेतेपद तर दोन सामने जिंकून नाशिक संघ उपविजेता ठरला.

अक्षया जाधवचा विजयात महत्वपूर्ण वाटा

महात्मानगर मैदानावर नाशिक विरुद्ध पुणे सामन्यात प्रथम फलंदाजी करत नाशिकने ४६.५ षटकांत १६९ धावा केल्या. श्रुती गीतेने ३० व कार्तिकी गायकवाडने २९ धावा केल्या. पुण्याच्या श्रुती भांगे व रिषिता सईकरने प्रत्येकी ३ ,अक्षया जाधवने २ तर प्रांजली पिसे व शिवांशी कपूरने प्रत्येकी १ बळी घेतला. विजयासाठीच्या १७० धावा पुण्याने ६ गडी गमावून ४८.१ षटकांत पार करत तिसऱ्या विजयाची नोंद केली. अक्षया जाधवने नाबाद ५७ तर प्रांजली पिसेने ४४ धावा केल्या. वैभवी बालसुब्रमणीयमने २ तर सिद्धि पिंगळे व प्रचिती भवरने प्रत्येकी १ बळी घेतला.

रत्नागिरीची आठ धावांनी मात

दुसऱ्या सामन्यात एस एस के मैदानावर रत्नागिरीने अतिशय चुरशीच्या लढतीत धुळेवर ८ धावांनी मात केली. रत्नागिरीने प्रथम फलंदाजी करत प्रांजल पवारच्या ७९ धावांच्या जोरावर १५१ धावा केल्या. धुळ्याच्या नेहा चव्हाणने ५ तर भूमी निंबाळकर व पूर्वा पाटीलने प्रत्येकी २ बळी घेतले. विजयासाठीच्या १५२ धावा करताना धुळे संघ १४३ पर्यंतच मजल मार शकला. ६९ धावा करणाऱ्या ज्ञानदा निकमची एकाकी लढत अपयशी ठरली. रत्नागिरीतर्फे समृद्धी शिवलकरने ५ ,महेक फैयाजने २ तर वेदिका व कनक यादवने प्रत्येकी १ बळी घेत हि चुरशीची लढत जिंकली.

Leave a Reply

Your email address will not be published.

X