याचि देही, याचि डोळा रंगला `चॅम्पियन्स` चा सोहळा कसा तो पहा….

नाशिक-महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आमंत्रितांच्या क्रिकेट ( एम सी ए सिनियर इन्विटेशन लीग ) स्पर्धेचे , विजेतेपद नाशिक संघाने रणजीपटू सत्यजित बच्छावच्या नेतृत्वाखाली मिळविले. या दैदीप्यमान कामगिरीच्या निमित्ताने नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे संघातील कर्णधार व सर्व खेळाडूंचा आज खास सत्कार करण्यात आला.

माजी अध्यक्ष विलासभाऊ लोणारी यांच्या हस्ते हुतात्मा अंनत कान्हेरे मैदान , गोल्फ क्लब येथे हा सोहळा झाला. यावेळी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे विजेत्या संघास एक लाख अकरा हजार रुपयांचे विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. व्यासपीठावर नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन चेअरमन विनोद शहा, सेक्रेटरी समीर रकटे , जॉइंट सेक्रेटरी योगेश ( मुन्ना ) हिरे , क्रिकेट ऑपरेशन कमिटीचे मुख्य राजेंद्र लेले उपस्थित होते याचि देही, याचि डोळा रंगलेल्या या सोहळ्याचा आनंद आपण पुढील व्हिडीओद्वारे घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published.

X