जळगाव , विजय क्लब, मध्य विभागाचे निर्णायक विजय
मंधवानी ची अष्टपैलू कामगिरी: पुंड,जैन,पाष्टे,नागपुरे,पवार, चव्हाण यांचीहीप्रभावी गोलंदाजी
नाशिक मध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय १४ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात जळगावने मध्य विभागावर १ डाव व १८० धावांनी मोठा विजय मिळवला. एस एस के क्रिकेट मैदानावर जळगावच्या या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला तो वीरज मंधवानी. वीरजने अष्टपैलू कामगिरी करत पहिल्या डावात ७ व दुसऱ्या डावात ५ बळी घेतले नी दहाव्या क्रमांकावर येत सर्वाधिक नाबाद ७४ धावा केल्या. मध्य विभागाच्या ध्रुव पुंडने एका डावात ५ बळी घेतले. तर दुसऱ्या सामन्यात जळगावने सोहम जैनच्या ७ व ५ बळी या जोरदार कामगिरीमुळे डी ए आर सी वर पहिल्या डावातील आघाडीचे गुण घेतले. डी ए आर सीच्या रणवीर चव्हाणने हि डावात ५ बळी घेतले.
मध्य विभागाचा सांघिक कामगिरीच्या जोरावर विजय
इतर सामन्यात एम सी सी क्रिकेट मैदानावर पहिल्या सामन्यात मध्य विभागाने सांघिक कामगिरी च्या जोरावर नांदेडवर १ डाव व ४९ धावांनी विजय मिळवला. ध्रुव पुंडने दोन्ही डावात ३-३ बळी घेतले . दुसऱ्या सामन्यात विजय क्लबने नांदेडवर १ डाव व ३२ धावांनी विजय मिळवला. विजय क्लबच्या हर्ष पाष्टे व प्रथमेश नागपुरेने तसेच नांदेडच्या चैतन्य पवार ने हि एका डावात ५ बळी घेतले.