अशोक जैन संघाने भालेकर करंडक पटकावला

सुधाकर भालेकर स्मृती करंडक स्पर्धा- पुराणिक इलेव्हनवर आठ गडी राखून दणदणीत मात

नाशिक- स्टार इलेव्हन नाशिकरोड पुरस्कृत, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित कै. सुधाकर भालेकर मेमोरियल चषक टिट्वेंटी स्पर्धेच्या अंतिम  फेरीत अशोक जैन इलेव्हन संघाने पुराणिक इलेव्हन संघावर आठ गडी राखून दणदणीत विजय नोंदवत मानाचा करंडक पटकावला.

 महात्मा नगर मैदानावर काहीशा एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात तेजस पवारच्या नेतृत्वात अशोक जैन इलेव्हन संघाने डॉ.  पुराणिक ईलेवन वर ८ गडी राखून विजय मिळवला. निफाडचे संतोष बिऱ्हाडे या विजेत्या संघाचे प्रशिक्षक होते. २४ साखळी सामन्यानंतर चार गटातील विजेत्यात उपांत्य व त्यानंतर अंतिम फेरी असे एकूण २७ सामने खेळविण्यात आले

स्टार इलेव्हन,सर्वज्ञ इंटरप्राईजेसचे सहकार्य .

स्टार क्रिकेट क्लब,सर्वज्ञ इंटरप्राईजेसचे विशाल संगमनेरे व डॉ प्रशांत भालेकर यांच्या सहकार्याने आयोजित कै सुधाकर भालेकर मेमोरियल ट्रॉफी चे यंदा अकरावे वर्ष होते . नाशिकचे लोकप्रिय, आदर्श माजी खेळाडू तसेच नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन पद भूषविलेल्या सुधाकर भालेकर ह्यांच्या स्मरणार्थ हि स्पर्धा खेळवलि जालि जाते . दरवर्षीप्रमाणेच स्टार इलेव्हनचे भालचंद्र गोसावी, चंद्रशेखर-बंडू- दंदणे, तरुण गुप्ता ह्यांचेसह, सुधाकर भालेकर ह्यांचे सुपुत्र प्रशांत भालेकर ह्यांचा व सहयोग स्पर्धा आयोजनासाठी मिळाला.

पारितोषिक वितरण उत्साहात

अंतिम सामन्यानंतर लगेच  या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब, मैदानावर झाला.भालेकर परिवारातर्फे या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून खास पुण्याहून आलेल्या दिवंगत सुधाकर भालेकर यांच्या पत्नी श्रीमती भालेकर यांचेसह सौ.  चंदन अनिल अध्यारु , स्टार क्रिकेट क्लब चे तरुण गुप्ता , नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे खजिनदार हेमंत देशपांडे, निवड समिति सदस्य सतिश गायकवाड उपस्थित होते. यावेळी तरुण गुप्ता यांनी कै सुधाकर भालेकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला. चंदन अध्यारु यांनीहि समयोचित भाषण केले. एन डी सी ए चे सी ई ओ रतन कुयटे यांनी आभार मानले . विवेक केतकर यांनी सुत्रसंचालन केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *