ईश्वरीच्या दणकेबाज शतकाच्या जोरावर नागालँडचा विजय

६२ चेंडूत २३ चौकारांसह नाबाद ११९ धावा

नाशिक- जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या  ईश्वरी सावकारने महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातर्फे  खेळताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआयच्या तेवीस  वर्षांखालील स्पर्धेत, नागालँड विरुद्ध केवळ ६२ चेंडूत २३   चौकारांसह नाबाद ११९ धावा तडकावल्या. ईश्वरीच्या या जोरदार कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र  संघाने नागालँड विरुद्ध २ बाद २०७ धावा करून १७४ धावांनी मोठा विजय मिळवला. नागालँडला ३३ धावांत गुंडाळताना नाशिकच्या रसिका शिंदेनेही एका षटकात १ बळी घेतला.

बीसीसीआय तर्फे १०  ते  २१  डिसेंबर २०२३ दरम्यान  त्रिवेंद्रम येथे खेळवल्या गेलेल्या सदर महिला टी-ट्वेंटी  सामन्यांच्या स्पर्धेत सलामी फलंदाज नाशिकच्या ईश्वरी सावकारने याआधी मणीपुर विरुद्ध नाबाद ४६ , हिमाचल प्रदेश विरुद्ध नाबाद ५९, तामिळनाडू विरुद्ध १९,  सिक्कीमवरील एकतर्फी विजयात नाबाद २३ अशी भरीव कामगिरी करत आपल्या उत्कृष्ट  फलंदाजीची चमक दाखविली.नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी ईश्वरी सावकारचे खास अभिनंदन करून पुढील अशाच जोरदारकामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *