केडन्स, ॲमबिशिअसचे निर्णायक विजय,नाशिकला पहिल्या डावातील आघाडीचे गुण

नील चंद्रात्रेची अष्टपैलु कामगिरी आंबलेचे सामन्यात अकरा, शौर्य जाधवचे ९ बळी,

नाशिक मध्ये चालू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय १४ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात , केडन्स व ॲमबिशिअसने निर्णायक विजय  मिळवले  तर नाशिकला पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळाले. नील चंद्रात्रेची अष्टपैलु कामगिरी आणि संपूर्ण सामन्यात आंबेले,शौर्य जाधवची उत्कृष्ठ गोलंदाजी हे सुध्दा वैशिष्ट्य ठरले.

एम सी सी क्रिकेट मैदानावर नाशिकने पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करत सी एन ए विरुद्ध पहिल्या डावात १७१ धावा केल्या. कर्णधार नील चंद्रात्रेने सर्वाधिक ७९ धावा केल्या. सी एन एच्या शौर्य जाधवने ६ तर शौर्य देशमुखने ३ बळी घेतले. उत्तरादाखल सी एन एने १५५ धावा केल्या. देवांश गवळीने ४ तर नील चंद्रात्रे व आर्यन घोडकेने प्रत्येकी ३  बळी घेतले. दुसऱ्या  डावात नाशिकने नील चंद्रात्रेच्या नाबाद ५१ धावांच्या जोरावर ५ बाद १२८ धावा केल्या. शौर्य जाधवने ३ बळी घेतले.  सी एन एच्या दुसऱ्या डावात ४ बाद ४६ धावांवर सामना अनिर्णित अवस्थेत संपला व नाशिकला पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळाले.

अकरा गडी बाद करण्याची सर्वीत्तम कामगिरी

दुसऱ्या सामन्यात महात्मानगर क्रिकेट मैदानावर केडन्सने सांगलीला ८ गडी राखून हरवले .  केडन्सच्या कर्णधार प्रसाद आंबलेने भेदक लेग स्पिन गोलंदाजीने सामन्यात एकुण ११ गडी बाद करत पुन्हा एकदा विजयात प्रमुख वाटा उचलला . सांगलीतर्फे दीप जाधवने ५० व ३३ धावा करत फलंदाजीत तर अलाम अत्तारने डावात ६ बळी घेत  गोलंदाजीत चमक दाखवली.

आर्य शिंदे,जीवन वराडेचा सुरेख खेळ

तिसऱ्या सामन्यात एस एस के क्रिकेट मैदानावर ॲमबिशिअसने उस्मानाबादवर १० गडी राखून मोठा विजय मिळवला. ॲमबिशिअसच्या आर्यन चौहानने नाबाद ५९ तसेच सामन्यात एकुण  १० बळी घेत अष्टपैलु कामगिरी केली. उस्मानाबादतर्फे आर्यन शिंदेने ५५ व जीवन वराडेने ४३ तर धावा करत फलंदाजीत तर अभिनव कांबळेने डावात ४ बळी घेत  गोलंदाजीत चमक दाखवली.महाराष्ट्रात नाशिक  कोल्हापूर व पुणे येथे राज्यस्तरीय साखळी स्पर्धा रंगत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *