कै. अविनाश आघारकर मेमोरिअल क्रिकेट चषकाचा शुभारंभ

महिलांसाठी विशेष आयोजन, एनडीसीए चा महत्वपुर्ण पुढाकार

नाशिक जिल्ह्याचे सुप्रसिद्ध क्रिकेटपटू व एन. डी . सी . ए . च्या महिला संघाचे प्रशिक्षक कै. अविनाश आघारकर ह्यांच्या स्मृतिनिमित्त, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे घेण्यात येत असलेल्याक्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरवात झाली. कै. अविनाश आघारकर ह्यांच्या पत्नी श्रीमती अदिती आघारकर यांच्याहस्ते नाणेफेक करून हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे सुरवात झाली.

कै. अविनाश आघारकर ह्यांनी महिला क्रिकेटच्या वाढीसाठी विशेष प्रयत्न केले होते.  त्यांनी अतिशय परिश्रम पूर्वक नाशिक जिल्हा महिला क्रिकेट चा एक चांगला संघ तयार केला. रोज सकाळी साडेसहा वाजता अतिशय नियमित ते महिला संघाचा हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सराव करून घेत असत. त्यांचेच हे फलित म्हणून आज महाराष्ट्राच्या महिला संघात विविध वयोगटात नाशिकच्या अनेक  क्रिकेट पटू आपल्या विशेष कामगिरीने मैदान गाजवत आहे.

प्रोत्साहनासाठी खास समितीची स्थापना

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनने पूर्वीच महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी एक खास समिती स्थापन केली असून त्यात शर्मिला साळी, सुचिता कुकडे, संगमनेरे  व भावना गवळी या समिती सदस्य आहेत . स्पर्धेचे सामने ९ जानेवारी ते १२ जानेवारी असे हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर खेळविले जाणार आहेत. स्पर्धेतील सहा संघांना अंजुम चोप्रा , मिताली राज , झुलन गोस्वामी अशी महिला क्रिकेट पटूंची नावे दिली आहेत .

फलंदाजीत ऐश्वर्या,शाल्मली,प्रचिती चमकले

पहिल्या दिवशी च्या सामन्यांत फलंदाजीत ऐश्वर्या वाघ ६५ , शाल्मली क्षत्रिय ४५ , प्रचिती भवर नाबाद ४३  , निधी भुतडा नाबाद ४१ , इशानी वर्मा नाबाद ४० , वैभवी बाल सूब्रमाणियम ४० व सायली टिळेकर एकूण ५६  धावा यांनी चमक दाखवली तर गोलंदाजीत दोन सामन्यात ईव्हा भावसार एकूण ४ , वेदिका जोंधळे एकूण ४ , दिव्या गायकवाड एकूण ३ , हिताक्षी अग्रवाल एकूण  ३, समीरा शाह एकूण ३ बळी अशी प्रभावी कामगिरी केली. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी एन. डी . सी . ए .चे संदीप सेनभक्त, मंगेश शिरसाट,  सुनिल मालुसरे, स्पर्धा समन्वयक डॉ भाविक मंकोडी,  महेश सावकार , पंच व खेळाडू उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *