जळगावचा नांदेडवर ६८२ धावांनी दणदणीत विजय

राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा- श्लोक महाजन २५१ व ५४: ध्रुव पुंडचे सामन्यात १० बळी,

नाशिक- येथे झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय १४ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात जळगावच्या श्लोक महाजनने  २५१ धावा फटकावल्या. एस एस के क्रिकेट मैदानावर नांदेड विरुद्ध मधल्या फळीत फलंदाजी करताना श्लोक महाजनने १९३ चेंडूत ४१ चौकार ठोकत जळगावला पहिल्या डावात ५३३ धावांचा डोंगर उभारून दिला. जळगावने दुसऱ्या डावातही आर्यन पाटीलच्या ८३ व श्लोकच्या नाबाद ५४ धावांमुळे २९३ धावा केल्या .वंश पाटीलने पहिल्या डावात ६ तर आर्यन  पाटीलने दुसऱ्या डावात ५ बळी घेतले. त्यामुळे जळगाव संघाने नांदेडवर तब्बल ६८२ धावांनी विजय मिळवत या प्लेट गटातील साखळी स्पर्धेतील संघांत पहिले स्थान मिळवले.

एम सी सी क्रिकेट मैदानावर डावखुरा मंदगती गोलंदाज ध्रुव पुंडचे सामन्यातील १० बळी व समर्थ जोशीच्या ५२ धावांच्या जोरावर मध्य विभागाने धुळे संघावर ३ गडी राखून  विजय मिळवला. धुळे संघातर्फे कृष्णा नेरकरने डावात ५ बळी तर पनव अग्रवालने ४४ धावा केल्या. ध्रुव पुंडने या स्पर्धेतील ५ सामन्यातील ८ डावात सर्वाधिक एकूण  ३४ बळी घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *