नाशिक क्रिकेट संघटनेतर्फे बुधवारी जिल्हा संघ निवड चाचणी

राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी आयोजन

नाशिक-महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे होणार्‍या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटने ( एन डी सी ए) तर्फे खुल्या गटातील खेळाडूंसाठी जिल्हा संघ निवड चाचणी बुधवारी(ता.१०) हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर(गोल्फ क्लब) घेण्यात येणार आहे.

इच्छुक खेळाडूंनीसंघटनेच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर कामकाजाच्या वेळेत (सकाळी ८.३० ते १०.३० व संध्याकाळी ४.०० ते ६.३०) दरम्यान संपर्क साधावा. ९ जानेवारी पर्यंत चाचणी शुल्कासह आपली नावे नोंदवावीत. संघ निवड चाचणी शुल्क प्रत्येकी पाचशे रुपये आहे.नावे नोंदविलेल्या खेळाडूंनी क्रिकेट पोषाखात स्वतःच्या क्रिकेट साहित्यासह बुधवारी(ता.१०) सकाळी साडेनऊला मैदानावर हजर रहावे.निवड झालेल्या खेळाडूंना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *