बीसीसीआयच्या कूच बिहार स्पर्धेत साहिल पारखचा डंका

नाशिक-भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – २०२३-२४ च्या कूच बिहार करंडक स्पर्धेत १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघातर्फेनाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या  साहिल पारखने , हैदराबाद व पुदुचेरी व ओडिशा नंतर बरोडा वरील विजयात देखील अर्धशतक झळकावले.

औरंगाबाद येथे झालेल्या चार दिवसीय सामन्यात महाराष्ट्र संघाने बरोडा संघावर ३०७ धावांनी मोठा विजय मिळवला. नाशिकचा  डावखुरा सलामीवीर साहिल पारखने पहिल्या डावात २७ व दुसऱ्या डावात ६२ धावा करत  महाराष्ट्र संघास विजय मिळवून देण्यात  मोठा वाटा उचलला.

संक्षिप्त धावफलक  : महाराष्ट्र – २७२ व दुसरा डाव २५८ वि  बरोडा – पहिला डाव १५३ व दुसरा डाव ७० .

२०२३ – २४ च्या कूच बिहार करंडक स्पर्धा , १७ नोव्हेंबेर ते १२  जानेवारी  दरम्यान भारतभर विविध ठिकाणी  होत आहेत .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *