बीसीसीआय च्या एकदिवसीय सामन्यांत ईश्वरी सावकारची चमकदार कामगिरी

महाराष्ट्राच्या विजयात उचलला मोलाचा वाटाः हरियाणा,उत्तरप्रदेशवर निर्णायक विजय

नाशिक. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे त्रिवेंद्रम येथे आयोजित वरिष्ठ महिला एकदिवसीय सामन्यांच्या  स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने हरयाणावर १०५ धावांनी तर उत्तर प्रदेश वर ३ गडी राखून विजय मिळवला. स्पर्धेत जिल्हा क्रिकेट संघटनेच्या ईश्वरी सावकारने महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघातर्फे खेळताना फलंदाजीची चमक दाखविली. ईश्वरीने हरीयाणा विरुद्ध  ६३ चेंडूत ४४ धावा व उत्तर प्रदेश विरुद्ध ३३ चेंडूत १५ धावा अशी कामगिरी करत विजयात हातभार लावला.नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या प्रशिक्षक भावना गवळी या संघाच्या व्यवस्थापकपदी  आहेत .

त्रिवेंद्रम येथे ४ ते १६ जानेवारी दरम्यान , बीसीसीआय तर्फे वरिष्ठ महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत, महाराष्ट्राचे बाकीचे साखळी सामने, पुढील प्रमाणे होणार आहेत : १०  जानेवारी राजस्थान , १२  जानेवारी  मेघालय , १४ जानेवारी गोवा , १६  जानेवारी जम्मू व काश्मीर .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *