भालेकर चषकासाठी अशोक जैन, डॉ. पुराणिक संघ अंतिम फेरीत भिडणार

आज लढतः नावाजलेल्या खेळाडूंच्या कामगिरीकडे लागले सर्वांचेच लक्ष

नाशिक-स्टार ईलेवन, नाशिकरोड पुरस्कृत, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित कै. सुधाकर भालेकर मेमोरियल चषक टिट्वेंटी स्पर्धेच्याउपांत्य फेरीत अशोक जैन इलेव्हन व डॉ.  पुराणिक इलेव्हन यांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला .

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान , गोल्फ क्लब वर झालेल्या उपांत्य फेरी सामन्यांचे संक्षिप्त धावफलक व निकाल :

१. अशोक जैनइलेव्हन  विरुद्ध व्ही पि बागुलइलेव्हन – अशोक जैनइलेव्हन – ५  बाद १२४  – तेजस पवार नाबाद ४२ व आशुतोष शिंदे २४  धावा  , तन्मय २ बळी वि व्ही पि बागुलइलेव्हन – सर्वबाद ५९  – विशाल मोहिते व आदित्य पांडे प्रत्येकी ३ व निशांत पगारे २ बळी. अशोक जैन इलेव्हन ६५  धावांनी विजयी .

२. बाबा शेलुकरइलेव्हन विरुद्ध डॉ.  पुराणिक इलेव्हन – बाबा शेलुकरइलेव्हन – ४  बाद १७५ – मेघ वडजे नाबाद ४९ वपुष्कर अहिरराव २७ धावा. अलिम पठाण ५ बळी. वि डॉ.  पुराणिकइलेव्हन – ९  बाद १५४ .  प्रणव पवार नाबाद ४६ व अलिम पठाण नाबाद ३७ धावा .  सिद्धार्थ नक्का २ व रिथविक जावळे १  बळी. डॉ. पुराणिकइलेव्हन ६ गडी राखून विजयी. मंगळवार २ जानेवारी रोजी अशोक जैनइलेव्हन व डॉ.  पुराणिक इलेव्हन या संघांमध्ये अंतिम सामना रंगेल.

खुल्या गटातील नाशिकच्या निवडलेल्या १६ संघांमध्ये , नाशिकचे प्रतिनिधित्व केलेल्या माजी खेळाडू, प्रशिक्षक व पदाधिकारी दिवंगत डॉ.  पुराणिक, व्ही पि बागुल , प्रभाकर दाते , चंदा शिंदे , बाबा शेट्टी, शेखर गवळी, अविनाश आघारकर,अख्तर शेख , विजय भोर, जयंतीलाल अशा नावांच्या  संघात , चार गटातील विजेत्यात हि उपांत्य फेरी झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *