संक्षिप्त धावफलक व निकाल

डॉ. पुराणिक इलेव्हन विरुद्ध अशोक जैन इलेव्हन : डॉ. पुराणिक ईलेवनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली.

डॉ. पुराणिक इलेव्हन – १८.२ षटकांत सर्वबाद ८४  – अलिम पठाण २६ तर अमित आहेर व रिजवान शेख प्रत्येकी १५ धावा.

निशांत पगारे ३ , सिद्धेश गरुड २ तर विशाल मोहिते , जयेश पवार व कुणाल त्रिपाठी प्रत्येकी १  बळी. 

वि अशोक जैन इलेव्हन – १२ .४ षटकांत २ बाद ८९ – योगेश महाले नाबाद २५, ओमकार उखाडे २३ व आशुतोष शिंदे २० धावा –अलिम पठाण २ बळी

अशोक जैन ईलेवन ८ गडी राखून विजयी .

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला – प्रणव पवार – ४ डावात , एका नाबाद शतकासह  २०९ धावा . तर सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरलेल्या  निशांत पगारे याने ५ डावात ११ बळी घेतले. सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक यश पगार ने ३ डावात  यष्टीमागे ४  बळी घेतले.  

मालिकावीराचा  बहुमान मिळवला अलिम मुनिर पठाण याने . त्याने गोलंदाजीत ५ डावात १० बळी तर फलंदाजीत ५ डावात १२८ धावा केल्या.

श्रीमती भालेकर व एन डी सी ए चे खजिनदार हेमंत देशपांडे यांचे हस्ते विजेत्या संघाला ट्रॉफी प्रदान करतानाचे छायाचित्र सोबत जोडले आहे. समवेत- तरुण गुप्ता, सतिश गायकवाड, रतन कुयटे, विवेक केतकर, सर्वेश देशमुख व संघ प्रशिक्षक.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *