सिक्कीमच्या विजयात ईश्वरी सावकारचा महत्वपूर्ण वाटा,चमकदार कामगिरीने वेधले लक्ष

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या  ईश्वरी सावकारने महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातर्फे  खेळताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय च्या तेवीस  वर्षांखालील स्पर्धेत,  मणीपुर विरुद्ध नाबाद ४६ व हिमाचल प्रदेश विरुद्ध नाबाद ५९, तामिळनाडू विरुद्ध १९ पाठोपाठ सिक्कीमवरील एकतर्फी विजयातही फलंदाजीची चमक दाखविली.

त्रिवेंद्रम येथे सिक्कीम विरुद्ध विजयासाठी ५० धावांचा पाठलाग करताना सलामी फलंदाज ईश्वरी सावकारने २१  चेंडूत ५  चौकारांसह नाबाद २३  धावा फटकावत महाराष्ट्र संघाला ७  व्या षटकात ९ गडी राखून विजयी केले.

त्याआधीहि  तामिळनाडू विरुद्धच्या विजयासाठी ८४ धावांचा पाठलाग करताना नाशिकच्या ईश्वरी सावकार १९ व साक्षी कानडीने १७ धावा फटकावत , फलंदाजीची चमक दाखवत एकतर्फी विजय मिळवला.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे सदर महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेचे साखळी सामने  १०  ते  २१  डिसेंबर २०२३ दरम्यान त्रिवेंद्रम येथे खेळविले जात  आहेत . महाराष्ट्राचे बाकीचे सामने पुढील प्रमाणे होणार आहेत :  १७  डिसेंबर – झारखंड, १९ डिसेंबर – विदर्भ , २१ डिसेंबर – नागालँड .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *